तुम्हाला विश्वास बसणार नाही पण
मार्केटिंग तुमच्या व्यवसायाला बरबाद सुद्धा करू शकते.
मित्रांनो मार्केटिंग चा वापर नेहमीच बिझनेस वाढवण्यासाठी केला जातो. परंतु जर तुम्हाला कोणी म्हटलं की मार्केटिंग तुमच्या व्यवसायाला भरवा सुद्धा करू शकते तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु भूतकाळामध्ये मागे वळून बघितले तर कित्येक कंपन्यांसोबत अशा गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु असं कसं होऊ शकत?
जर तुमच्या बिझनेस मध्ये या दोन गोष्टी नसतील तर आहे होऊ शकते. कारण या गोष्टी नसताना मार्केटिंग करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा व्यवसाय बरबाद करण्यासारखा आहे. चला तर बघू यात काय आहे त्या दोन गोष्टी.
1. तुम्ही ग्राहकांना खरंच व्हॅल्यू देताय का?
तुम्ही ग्राहकांना खरंच व्हॅल्यू देताय का हे तपासा. जर तुमचं प्रॉडक्ट किंवा ऑफर ग्राहकांना व्हॅल्यू देऊ शकत नसेल, जर तुमच्या प्रॉडक्ट मुळे ग्राहकांचा खरोखर फायदा होत नसेल तर आत्ताच मार्केटिंग थांबवा; कारण तुमचे नाराज ग्राहक तुमच्यापेक्षा जास्त वेगाने तुमची निगेटिव्ह मार्केटिंग करतील. मार्केटमध्ये तुमचे नाव खराब होईल. आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय बरबाद होईल. त्यामुळे ग्राहकांसाठी योग्य व्हॅल्यू असणारे प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ऑफर करा आणि त्यानंतर मार्केटिंग करा.
आणि याचा आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे मार्केटिंगची ऐक कॉस्ट असते. तुमचा जुना ग्राहक जर परत परत तुमच्याकडे आला तर ती कॉस्ट तुम्ही वाचाऊ शकता. त्यामुळे मार्केटिंग करण्या आधी ग्राहकांसाठी व्हॅल्यू तयार करा.
2. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सिस्टम आणि प्रोसेस सेट केले आहेत का?
दुसरी गोष्ट म्हणजे सिस्टम्स आणि प्रोसेस. तुमच्या बिझनेस मध्ये जर सिस्टम्स आणि प्रोसेस सेट नसतील, बिजनेस चे रेवेन्यू मॉडेल फिक्स नसेल तर जास्त कस्टमर आल्यामुळे तुमचा बिजनेस collapse होऊ शकतो. मार्केटिंग मुळे अचानक आलेले खूप सारे ग्राहक तुम्ही हाताळू शकता का? जास्त ग्राहक आल्यामुळे तुमचे प्रॉडक्टची आणि सर्विस ची कॉलिटी तर कमी होणार नाही ना? असे प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचे उत्तर भेटल्यानंतरच मार्केटिंग करा.
हीच गोष्ट इंस्टाग्राम सोबत सुद्धा झाली होती. सुरवातीला इंस्टाग्राम चे युजर्स वाढत होते. त्यांना सांभाळण्यासाठी इंस्टाग्राम कडे सिस्टम नव्हती आणि इंस्टाग्राम मधून पैसे कमवण्यासाठी रेवेन्यू मॉडेल सुद्धा नव्हते. इंस्टाग्रामची सिस्टम सतत क्रॅश होत होती. आणि या सगळ्या प्रेशरला त्यांची टीम वैतागली होती. आणि कदाचित ह्याच प्रेशर मध्ये इंस्टाग्राम च्या फाउंडर ने इंस्टाग्राम फेसबुकला विकण्याचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे आधी आपल्या बिझनेस चां पाया भक्कम करण्यावर भर द्या. ग्राहकांसाठी योग्य व्हॅल्यू तयार करा आणि येणाऱ्या ग्राहकांना सांभाळण्यासाठी सिस्टम आणि प्रोसेस सेट करा आणि त्यानंतर तुम्ही तयार आहात भरपूर मार्केटिंग करण्यासाठी. मार्केटिंग शिकण्यासाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजवर जाऊ शकता.